प्रा. के. डी. कदम यांची पिंपळनेर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी नियुक्ती | पुढारी

प्रा. के. डी. कदम यांची पिंपळनेर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य पदी नियुक्ती

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
येथील कर्म.आ.मा.पाटील कला, वाणिज्य व कै. अण्णासाहेब एन. के. पाटील विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर येथील महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्यपदी गणित विभाग प्रमुख प्रा. के. डी. कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रा. के. डी. कदम यांनी माजी प्र. प्राचार्य डॉ. पी. के. अहिरे यांच्याकडून प्राचार्य पदाचा पदभार संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वीकारला. प्रा. कदम हे गेल्या ३५ वर्षापासून महाविद्यालयात गणित विभागाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी, आय. क्यू. ए. सी. चे समन्वयक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक अशी विविध पदे त्यांनी यापूर्वी भूषविली आहेत. त्यांच्या पदग्रहणप्रसंगी संस्थेचे रूपचंद नारायण शिंदे (अध्यक्ष, पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी) सुरेंद्र विनायकराव मराठे (उपाध्यक्ष), आत्माराम सोनू बिरारीस (सचिव), धनराज राजमल जैन (चेअरमन, कॉलेज कमिटी) हिरामण रघुनाथ गांगुर्डे (चेअरमन, वसतीगृह कमिटी) सुभाष हिरालाल जैन (चेअरमन, स्कूल कमिटी), डॉ. विवेकानंद नारायण शिंदे (व्हाईस चेअरमन स्कूल कमिटी), नारायण पुंजू भदाणे (संचालक), ए. बी. मराठे (संचालक), आर. पी. लोहार (संपर्क अधिकारी) व सर्व संचालक मंडळ पिंपळनेर एज्युकेशन सोसायटी, माजी प्र. प्राचार्य डॉ. पी. के. अहिरे, प्रा. डॉ. डब्ल्यू. बी. शिरसाठ, प्रा. डॉ. बी. सी. मोरे, प्रा. के. आर. राऊत, प्रा. डॉ. एस. पी. खोडके, प्रा. डॉ. वाय. एम. नांद्रे, प्रा. एल. जे. गवळी, प्रा. एस. एन. तोरवणे, के. एन. विसपुते (कार्यालयीन अधीक्षक), सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button