नाशिक : एमडीआरटी-२०२३ आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी शेतकरी पुत्राची अमेरिकन वारी | पुढारी

नाशिक : एमडीआरटी-२०२३ आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी शेतकरी पुत्राची अमेरिकन वारी

नाशिक (नगरसुल) : पुढारी वृत्तसेवा 
येवला तालुक्यातील कोळगाव शेतकरी कुटुंबातील सुदाम गाडेकर यांच्या संदर्भात  “कामयाबी एक दिन मे नही मिलती; मगर किसी ने ठान ली तो एक दिन जरूर मिलती है”, जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि प्रामाणिकपणा असेल तर कोणताही सामान्य माणूस प्रचंड मोठी कामगिरी करू शकतो.  कोळगाव या छोट्याशा खेडेगावतील शेतकरी कुटुंबातील सुदाम गाडेकर यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. भारतीय जीवन बिमा निगम तर्फे दिला जाणारा आंतरराष्ट्रीय दर्जाचा ‘एमडीआरटी’ बहुमानाचा पुरस्कार येवले तालुक्यातून प्रथमच यांनी पटकावला आहे. त्यामुळे शेतकरीपुत्र अमेरिका वारीला रवाना होणार आहे.
“एमडीआरटी-२०२३” हा बहुमान पटकावणारे गाडेकर हे येवला तालुक्यातील प्रथम विमा सल्लागार आहेत. जीवन विमा व आरोग्य विमा योजना येवले तालुक्यातील ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी त्यांनी सोळा वर्ष कठोर परिश्रम घेतले आहेत. या कामात भारतीय जीवन विमा निगम मनमाड शाखेचे शाखाधिकरी अरुण सोनवणे, नवीन व्यवसाय विभागाचे अधिकारी अशोक कुक्कर, विकास अधिकारी रोहित पगारे, संजय दारोळे, मनोज वाघ, सुनील वाढवणे, देवेन्द्र पगार, किरण गांगुर्डे, शैलेंद्र तळेकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. येवला तालुका पत्रकार संघाच्या वतीने एलआयसी एमडीआरटी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने तसेच अमेरिकावारीसाठी निवड झाली असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण घुगे, भाऊलाल कुडके, रविंद्र करमासे, संतोष विंचू, राजेंद्र परदेशी, विलास पगारे, शिवाजी भालेराव, सुदर्शन खिल्लारे, भिमाजी शिंदे, सिताराम बैरागी, मुकूंद अहिरे, बापुसाहेब वाघ, संतोष घोडेराव, प्रमोद पाटील, दिपक सोनवणे, अनिल अलगट, दीपक ढोकळे, धर्मा पारखे, रामदास क्षीरसागर, अनिल जाधव आदी पत्रकारांच्या वतीने सावंतवाडी (जि. रत्नागिरी) येथे अभ्यास दौऱ्या दरम्यान त्यांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा:

Back to top button