नाशिक : इगतपुरीच्या जिंदाल कारखान्यातील आगीवर नियंत्रण | पुढारी

नाशिक : इगतपुरीच्या जिंदाल कारखान्यातील आगीवर नियंत्रण

नाशिक ; पुढारी ऑनलाईन इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील जिंदाल पॉलिफिल्म कारखान्यात रविवार, दि. 1 मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू आणि १७ जण जखमी झाले होते. आज (सोमवार) सकाळपर्यंत या कारखान्यातून आगीचे लोट आणि धूर बाहेर पडत होता. दरम्‍यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत त्यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

कारखान्यात आगीने रौद्ररूप धारण केल्याने इगतपुरी तालुक्याच्या विविध भागातून दूरवरुनही आगीचे लोळ दिसून येत होते. या घटनेत जीवितहानी झाली आहे. इगतपुरी तालुक्यासह नाशिकच्या विविध भागातून अग्निशमन यंत्रणा सक्रिय काम करीत होत्‍या. पोलिसांनी तातडीने दखल घेऊन घटनास्थळी धाव घेतली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या प्रकाराने जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहेत. कंपनीच्या परिसरात कामगार व नातेवाईकांनी प्रचंड गर्दी केली होती. कंपनीच्या परिसरामध्ये धुराचे लोट पसरल्‍याचे चित्र दुरवरून दिसत होते.

हेही वाचा :  

Back to top button