Nashik Marathon : गुलाबी थंडीत धावले हजारो नाशिककर | पुढारी

Nashik Marathon : गुलाबी थंडीत धावले हजारो नाशिककर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पहाटेची गुलाबी थंडी अन अंगाला झोंबणारा गार वारा, अनोख्या शैलीत व संस्‍कृत श्र्लोक उच्चारत व त्‍यास उपस्‍थितांनी टाळ्यांच्‍या स्‍वरूपात उत्स्फूर्तपणे दिलेली दाद. अशा उत्साहवर्धक वातावरणात हजारो नाशिककर धावले. निमित्त होते लाडशाखीय वाणी मित्रमंडळातर्फे आयोजित मॅरेथॉनचे.

मॅरेथॉनला समाजबांधवांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. सुमारे पाच हजार नागरिक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. विशेष म्‍हणजे शाळकरी मुले, महाविद्यालयीन युवक, महिलांसह समाजातील ज्‍येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय राहिली. सहभागींच्‍या आरोग्‍याच्‍या दृष्टीने सर्व वैद्यकीय सुसज्‍जता ठेवण्यात आलेली होती. ठक्‍कर डोम येथून मॅरेथॉनला सुरुवात करताना मनोहर गार्डन आर. डी. सर्कलमार्गे पुन्‍हा ठक्‍कर डोम येथे मॅरेथॉनचा समारोप झाला.

तत्पूर्वी, मॅरेथॉनला पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ झाला. यावेळी लाडशाखीय वाणी मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोद दशपुते, सरचिटणीस नितीन दहिवेलकर, गिरीश मालपुरे, चंद्रकांत धामणे, योगेश बागड, भूषण अरुण सोनजे, प्रशांत सोनजे, सुरेश धामणे, विजय खैरनार, विवेक वाणी यांच्‍यासह समाजबांधव उपस्‍थित होते. उपक्रमासाठी गिरीश महाजन, नीलेश कोतकर, राजेश कोठावदे, जगदीश कोठावदे, नीलेश पूरकर, राजेंद्र बागड, भूषण कोठावदे, ज्ञानेश्वर धामणे आदींनी विशेष परिश्रम घतेले.

हेही वाचा :

Back to top button