मोदीसाहेबनी हेठळ भाजपने एकतर्फी बहुमती, नाशिकमधील गुजराती बांधवांचे मत | पुढारी

मोदीसाहेबनी हेठळ भाजपने एकतर्फी बहुमती, नाशिकमधील गुजराती बांधवांचे मत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने आपला गड राखताना काँग्रेस आणि आपचा सुपडा साफ केला. विक्रमी विजयाची नोंद करताना, गुजरातमध्ये भाजपला अद्यापपर्यंत पर्याय नसल्याचे दाखवून दिले. भाजपच्या या विक्रमी विजयात ‘मोदी फॅक्टर’ अन् ‘विकास’ या दोन बाबी जमेच्या ठरल्या, असे मत नाशिकमधील गुजराती बांधवांनी व्यक्त केले आहे. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसह उद्योगधंदे, राेजगार देण्यात भाजप यशस्वी ठरला आहे. परिणामी गुजराती जनतेने पुन्हा एकदा भाजपला भरभरून मते दिल्याचेही गुजराती बांधवांनी सांगितले.

घोलेरा शहराचा विकास

‘मोदी हैं तो मुमकीन हैं’ याप्रमाणे मोदींची लाटच गुजरातमध्ये असेल, हे आम्ही जाणून होतो. आज सबंध गुजरातचा विकास करण्यास भाजपला यश आले आहे. कोणालाही लाजवेल, अशा प्रकारे घोलेरा शहराचा विकास करण्यात आला आहे. त्यामुळे गुजराती जनतेने पुन्हा एकदा मोदींवर विश्वास टाकला आहे.

– विनोद तन्ना

 

मोदींमुळेच विक्रमी यश

वीज, पाणी, रस्ते या मूलभूत सुविधांसह औद्योगिक विकास साधण्यास मोदींना यश आले आहे. मुख्यमंत्री असताना, त्यांनी जी कामे केली आहेत. त्यामुळेच हे विक्रमी यश भाजपला मिळवता आले. त्यामुळे जो पक्ष विकासाला महत्त्व देईल, त्याला जनता कौल देणारच.

– मिलाप पटेल

 

१५ ते २० जागा जास्त

मोदी यांनी केलेला विकास पाहता १३५ पर्यंत जागा मिळतील, असे अपेक्षित होते. मात्र, त्यापेक्षा अधिक १५ ते २० जागा भाजपला मिळाल्या. माझ्या मते, आपमुळे काँग्रेसला फटका बसल्याने, भाजपच्या या जागा वाढल्या आहेत. पण, मोदींनी केलेला विकास हेच यशाचे गमक आहे.

-जिग्नेश पटेल

 

‘आप’चा मोफतचा फॉर्म्युला नाकारला

विकासाचा मुद्दा आहेच शिवाय गुजराती लोकांना विश्वास देण्यास भाजप यशस्वी ठरले आहे. त्यामुळे आप आणि काँग्रेसला का मते द्यावीत? असा प्रश्न होता. आपचा मोफतच फॉर्म्युला तर सपशेल अपयशी ठरला. दोन राज्यांनंतर आप तिसऱ्या राज्यात येणार नाही, हेदेखील तितकेच खरे आहे.

– धनसुख पटेल

 

मोदी फॅक्टरमुळेच यश…

मोदींमुळेच गुजरातमध्ये भाजपला भरभरून यश मिळाले आहे. मोदींनी गुजरातमध्ये विकासाची लाट आणली आहे. मुख्यमंत्री कोणीही असो, मोदी फॅक्टरमुळेच भाजपला हे यश मिळाले आहे. गुजराती मतदारांचा भाजपवर विश्वास असून, तो पुन्हा एकदा सार्थकी ठरवला आहे.

– हर्षद पटेल

हेही वाचा :

Back to top button