धुळे : हप्ते थकवून ट्रॅक्टर शोरूम मालकाची फसवणूक, दोघांवर गुन्हा | पुढारी

धुळे : हप्ते थकवून ट्रॅक्टर शोरूम मालकाची फसवणूक, दोघांवर गुन्हा

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवाि

साक्री शहरातील खानदेश किसान ट्रॅक्टर शोरूम मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर खरेरीदाराने कर्जाचे हप्ते थकविल्याने ही कारवाई करण्यात आली.

शोरूम मालक विवेक दत्तात्रय शेवाळे (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १९ सप्टेंबर २०२१ ला व्हीएसटी शक्ती ९०४५ हा सहा लाख ८२ हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर राजेश रमेश मोरे (४०, रा. जामकी, पो. वासखेडी, ता. साक्री) याने उधारीने खरेदी केले. ट्रॅक्टरचे आरटीओ पासिंग झाल्यावर ट्रॅक्टरला एमएच १८ बीआर ९३८३ क्रमांक मिळाला. यासह एचडीबी फायनान्स यांच्याकडून कर्ज घेऊन रोनालिका कंपनीचे एक लाख १५ हजार रुपये किमतीचे रोटर खरेदी केले. मात्र, ट्रॅक्टर आणि रोटर खरेदी प्रकरणातील हफ्ते त्यांनी वेळेवर भरले नाहीत. यासंदर्भात कंपनीने वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही मोरे यांनी दिलेले धनादेश वटले नाही. त्यामुळे जवळपास ३ लाख ६८ हजार रुपये येणे बाकी असतानाही रक्कम भरण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यासंदर्भात साक्री पोलिस ठाण्यात राजेश मोरे, शांताराम मन्साराम सोनवणे (वय ५५ ) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button