जळगाव : एकनाथ खडसेंविरोधात बंजारा समाज आक्रमक | पुढारी

जळगाव : एकनाथ खडसेंविरोधात बंजारा समाज आक्रमक

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य केले आहे. त्‍यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात यावा, अशी मागणी करत बंजारा समाज बांधवांनी जळगाव, चाळीसगाव येथे आंदोलन केले.

जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील बंजारा समाज बांधवांनी यावेळी खडसे यांनी आमदारकीचा राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी केली.  खडसे यांच्या विरोधात जोरदारपणे घोषणाबाजी केली. यानंतर बंजारा समाजबांधवांतर्फे शिवतीर्थ मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा नेण्यात आला.

चाळीसगावला निषेध आंदोलन

राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी समस्त बंजारा समाजाविषयी बदनामीकारक वक्तव्य करून समाजाचा अवमान केला आहे. हा अवमान बंजारा समाज कधीही खपवून घेणार नाही. खडसेंनी समाजाची जाहीर माफी मागावी, यासाठी चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा  

Back to top button