धुळे : गुटख्याची तस्करी, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

धुळे : गुटख्याची तस्करी, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे, पुढारी वृत्तसेवा :  गुटख्‍याची तस्करी करण्याचा प्रकार तालुका पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणात गाडीचा चालक व क्लीनरसह पान मसाल्याचा पुरवठादार, वाहन मालक आणि माल खरेदी करणार्‍या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. गुटखा तस्‍करी करणार्‍यांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या जातील, असा इशारा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गावरून गुटख्याची पान मसाल्याची तस्करी सुरू होती. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यानुसार मुंबई-आग्रा महामार्गावर आर्वी दुरक्षेत्र कार्यालयासमोर सापळा लावण्‍यात आला. मध्य प्रदेशातून येणारी  क्रमांकाची आयशर ( एमपी 13 जीए 9505)अडवली. तपासणी केली असता गाडीमध्ये सुमारे 19 लाख 31 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

पान मसाला आणि तंबाखूच्या साठ्यासह सात लाख रुपये किंमतीचे गाडी जप्त करण्‍यात आली आहे. या संदर्भात गाडीचा चालक मनोज घनश्याम कौशल तसेच क्लिनर शिवचरण भोगले यादव यांच्यासह पान मसाल्याचा पुरवठादार, वाहन मालक आणि मालाच्या खरेदी दाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.हेही वाचा  

 

Back to top button