Nashik : क्रियाशील सभासदांनाच उमेदवारी, भुजबळांची आढावा बैठकीत घोषणा | पुढारी

Nashik : क्रियाशील सभासदांनाच उमेदवारी, भुजबळांची आढावा बैठकीत घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी मोहिमेतील क्रियाशील सभासद तसेच मोहीम यशस्वी राबविणार्‍या सभासदांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची उमेदवारी देण्यात येणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर करत निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी तसेच जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन केले.

नाशिक शहर व जिल्हा आढावा बैठक भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन नाशिक येथे पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहर व जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांकडून पक्षाच्या कामकाजाबाबत छगन भुजबळ यांनी आढावा घेतला. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, कार्याध्यक्ष विष्णूपंत म्हैसधुणे, प्रदेश पदाधिकारी नाना महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, अर्जुन टिळे, अशोक सावंत, माजी आमदार जयवंत जाधव, संजय चव्हाण, शिवराम झोले, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, राजेंद्र डोखळे, अ‍ॅड. शिवाजी सहाणे, डॉ. सयाजी गायकवाड, संजय बनकर, पुरुषोत्तम कडलग, सचिन पिंगळे, माजी नगरसेवक गजानन शेलार, सुषमा पगारे, समिना मेमन, जगदीश पवार, हरीश भडांगे, डॉ. शेफाली भुजबळ, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्षा अनिता भामरे, कविता कर्डक, पूजा आहेर, आशा भंदुरे, समाधान जेजुरकर, संजय खैरनार आदी उपस्थित होते.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, संपूर्ण तयारी करून ताकदीनिशी या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक घराघरांत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार आणि प्रसार करावा. येणार्‍या निवडणुका या विविध पातळ्यांवर लढाव्या लागणार आहेत. त्यासाठी शिबिरांचे आयोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील प्रत्येक विभागात तसेच ग्रामीण भागात तालुकानिहाय एकदिवसीय शिबिरांचे आयोजन करण्याची सूचना भुजबळ यांनी केली.

यावेळी मनीष रावल, डॉ. विष्णू अत्रे, डॉ. योगेश गोसावी, मधुकर मौले, सलीम शेख, धनंजय निकाळे, सुरेश आव्हाड, डॉ. अमोल वाजे, धनंजय रहाणे, शंकर पिंगळे, दीपक वाघ, ऐश्वर्या गायकवाड, योगिता आहेर, शैलेश ढगे, सुरेखा निमसे, मनोहर कोरडे, डॉ. संदीप चव्हाण, मनोहर बोराडे, योगेश दिवे, राजेश भोसले आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button