नाशिक ञ्यंबक रस्त्यावरील अपघातातील मयताची ओळख पटविण्याचे पाेलिसांचे आवाहन | पुढारी

नाशिक ञ्यंबक रस्त्यावरील अपघातातील मयताची ओळख पटविण्याचे पाेलिसांचे आवाहन

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा

ञ्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंबाळे शिवारात नाशिक ञ्यंबक रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मयत झालेल्या महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन ञ्यंबक पोलीसांनी केले आहे.

मयत अनोळखी स्त्री वय अंदाजे ६० वर्ष, उंची १५५ सेमी रंगाने सावळी चेहरा गोल, नाक सरळ, डोक्याचे केस अर्धवट सफेद वाढलेले कुरुळे, शरीराने मध्यम असून तिची ओळख अदयाप पटलेली नाही. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी खंबाळे शिवारातील पाझर तलावाजवळ पारदेश्वर तंत्रपिठासमोर नाशिक त्र्यंबक रस्त्यावर अज्ञात वाहनाने पायी चालणारी अनोळखी व्यक्तिला धडक दिली. या अपघातात महिला जागीच मयत झाली. याबाबत ञ्यंबक पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मयताचा मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयातील शवगृहात ठेवण्यात आला आहे. याबाबत मयत महिलेची माहिती कोणाला आढळल्यास त्र्यंबक पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button