जळगाव : नवजात बाळाला सोडून मातेचे पलायन - पुढारी

जळगाव : नवजात बाळाला सोडून मातेचे पलायन

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा :  

चाळीसगाव तालुक्यातील बेलदारवाडी शिवारातील झटका देवी वस्ती बेलदारवाडी जवळ नाल्यामध्ये नवजात बाळाला सोडून मातेचे पलायन केल्‍याची घटना समोर आली. अज्ञात पालकांनी नवजात पुरुष जातीचे अर्भक उघड्यावर टाकले. ही घटना (सोमवार) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. नवजात बाळाला सोडून मातेचे पलायन केल्‍याच्या घटनेची परीसरात चर्चा सुरू होती.

यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, महिला पोलीस कर्मचारी मालती बच्छाव, चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ राजेश लाटे, 108 चालक अशोक राठोड, विनोद चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन नवजात अर्भक ताब्‍यात घेतले.

यानंतर कायदेशीर कारवाई करून मिळून आलेले नवजात पुरुष जातीच्या अर्भकास 108 एम्बुलन्सच्या साह्याने उपचारासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

या नवजात अर्भकासाठी गरम कपडे, दूध, बॉटल, आणि इतर आवश्यक वस्तू खरेदी करून दिल्या. या बालकावर औषधोपचार सुरू आहेत. अज्ञात पालकां विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ : धनंजय महाडिक यांच्या घरचा गणेशोत्सव

Back to top button