Nashik : वनविभागाच्या कारवाईत लाकडासह चार टेम्पो जप्त | पुढारी

Nashik : वनविभागाच्या कारवाईत लाकडासह चार टेम्पो जप्त

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
अवैध वृक्षतोडीविषयी तक्रारीचा सूर व्यक्त झाल्यानंतर अखेर वनविभाग सक्रिय झाला आहे. बेकायदेशीर लाकूड वाहतुकीला आळा घालण्यासाठी उपविभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी जगदीश येडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव हिरे यांनी चार पथकांची निर्मिती केली आहे.

या पथकाने मंगळवारी (दि.1) रात्री सायने बुद्रूक, कुसुंबा रोड, सटाणा रोड, सोयगाव व बालाजी पेट्रोल पंप (सटाणा रोड) या भागांत वाहनांची तपासणी केली. चार टेम्पोंमध्ये कडूनिंब, आंबा, शिसव या जातीच्या लाकडांची वाहतूक होत असल्याचे उघड झाले. एकूण सुमारे 18 घनमीटर लाकूड व चारही टेम्पो जप्त करण्यात आले. लाला अलीम सय्यद (एमएच 04 एस 3268), अन्सारी अर्शद हुसैन (एमएच 18 एम 915), अन्सारी कलीम अहमद सुभान (एमएच 17 सी 7023), सईद खान अहमद खान (एमएच 04 सी 9552) यांच्यावर भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

वनपाल बी. एस. सूर्यवंशी, ए. जे. शिंदे, जे. के. शिरसाठ, ए. एच. शेख, अतुल देवरे, वनरक्षक वाय. के. पाटील, एस. के. दैतकर, आर. के. बागूल आदींनी ही कारवाई केली.

हेही वाचा :

Back to top button