Sushma Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे नैजरकैदेत, हॉटेलबाहेर पोलिसांचा गराडा | पुढारी

Sushma Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे नैजरकैदेत, हॉटेलबाहेर पोलिसांचा गराडा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगर येथे शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारेंची (Sushma Andhare) सभा होती. तर याचठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सभा होती. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील सध्याची परिस्थिती पाहता जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्ह्यात कलम १४४ लागू करत या दोन्ही सभांना परवानगी नाकारण्यात आली. मात्र, सुषमा अंधारे यांनी आपण सभा घेणारच असा पवित्रा घेतला आहे. यानंतर आता हे प्रकरण तापताना दिसत आहे.

मुक्ताईनगर येथे महाप्रबोधन सभेला जिल्हा प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. मात्र, तरीही आपण सभा घेणारच, असा पवित्रा ठाकरे गटाने घेतल्याने जळगाववरून मुक्ताईनगर कडे जाण्यापूर्वीच पोलिसांनी सुषमा अंधारे यांना केले नजरकैद केले आहे. पोलिसांनी सुषमा अंधारे यांना हॉटेल के. पी. प्राईडमध्ये नजर कैद केले आहे. साध्या वेशातील पोलीस व महिला पोलिसांकडून सुषमा अंधारे यांना नजर कैद केले आहे. (Sushma Andhare)

मी आतंकवादी नाही…

मी काही आतंकवादी नाही किंवा दहशतवादी नाही. पोलिस मला जीवे तर मारणार नाहीत ना? खासगी मालमत्ता असलेल्या ठिकाणीही ३०० ते ४०० पोलिसांचा गराडा पडलेला आहे. मी संविधानिक विचार मांडते, तरीही तुम्ही घाबरता कशाला? असा सवाल उपस्थित करत सुषमा अंधारे यांनी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओडले आहेत. मी जळगाव जिल्ह्यातले प्रश्न मांडत असेल तर माझा जीव घेणार का? मी सर्व गोष्टींना तयार असल्याचा इशाराही सुषमा अंधारे यांनी यावेळी सरकारला दिला आहे.

गुलाबराव पाटील घाबरलेत…

यानंतर सुषमा अंधारे म्हणाल्या, पोलिसांचा आक्षेप हा माझ्यावर नाही. महाप्रोबधन यात्रेत एकही असंसदीय शब्द आम्ही वापरला नाही. गुलाबराव पाटील या सभांना पाहून घाबरलेत. ऐवढाच त्याचा अर्थ निघतो. गुलाबराव पाटील बिथरलेले आहेत. गुलाबराव पाटील अस्वस्थ झालेले आहेत. आम्ही सांगितलं तर सभा रद्द करू शकतो. आमचा तेवढा दरारा आहे, असं गुलाबराव पाटील यांनी स्वतः सांगितलं. याचा अर्थ तुम्ही सत्तेचा गैरवापर करता आहे. तुमचा तो दरारा, तुमची ती गुंडगिरी, हे सभा आधीच जाहीर करूनही सभा रद्द करता, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

हेही वाचा;

Back to top button