नाशिक : देवळालीला पंपिंग स्टेशन जवळ बिबट्या जेरबंद | पुढारी

नाशिक : देवळालीला पंपिंग स्टेशन जवळ बिबट्या जेरबंद

नाशिक, देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा 

दारणा काठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंपिंग हाऊस जवळ सोमवारी (दि. 31) रोजी रात्री 9 वाजेच्या दरम्यान पुन्हा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी नि सुटकेचा निःश्वास सोडला आहे. भगुर दारणा नदी लगत देवळाली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपीग स्टेशन वर कॅन्टाेन्मेन्ट बोर्डाचे कंत्राटी कामगार दिवस रात्र पाणी सोडण्याचे काम करत असून याच परिसरात उसाची शेती असल्याने कामगार शेतक-यांना बिबट्याचा धोका होता.

या भागात पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे करण्यात आली होती. यावर वनविभागाच्या वतीने पाहाणी करून पंपीग स्टेशन लगत पिंजरा लावण्याता आला होता. सोमवारी (दि. 31)  रात्री 9च्या दरम्यान बिबट्या पिंजऱ्यात अलगत अडकला.  नागरिकांनी बघितल्या नंतर वनविभागाला कळविले. वनविभागाचे अधिकारी विवेक भदाणे, विवेक अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली वनाधिकारी सचिन आहेर, शारद अस्वले, विशाल शेळके आदींनी  घटना स्थळी दाखल होऊन पिंजरा ताब्यात घेतला.

यावेळी पंपीग स्टेशनचे कर्मचारी रोहित जाधव,  राहुल साबळे, धीरज शिंदे,  संदीप गोरे, ओंकार मोजाड, मयुर गोरे, विजय दुगड, अक्षय यंदे आदींनी मदत केली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी बिबट्यासह पिंजरा घेऊन नाशिक ला रवाना झाले. यावेळी स्थानिक नागरिकांनी व शेतकरी -कामगारांनी या परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने अजूनही काही बिबटे असल्याचे सांगत पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button