मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदुरबार जिल्हा दौरा भाजपाच्या बहिष्काराने गाजणार? | पुढारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नंदुरबार जिल्हा दौरा भाजपाच्या बहिष्काराने गाजणार?

नंदुरबार : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवार 29 ऑक्टोंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेचे येथील नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्हा मेळाव्याची जोरदार तयारी केलेली आहे. नंदुरबार नगर परिषदेने उभारलेल्या भव्य आकर्षक इमारतीचे उद्घाटन देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते केले जाणार आहे.

मोठ्या थाटामाटात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे अन्य मंत्री देखील निमंत्रित करण्यात आले आहेत. तथापि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या अन्यमंत्र्यांचे दौरे जाहीर झालेले नाहीत.

“आमचा संघर्ष भाजपाशी चालूच राहील”, अशी भूमिका शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेचे येथील नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी दीड महिन्यापूर्वी जाहीर केली होती.

दरम्यान मुख्यमंत्री यांचा जाहीर झालेला दौरा आणि त्यांच्या उपस्थितीत होणारे कार्यक्रम थोडक्यात असे-

शनिवार 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 10.40 वाजता पोलीस कवायत मैदान, नंदुरबार हॅलीपॅड येथे आगमन. सकाळी 10.45 वाजता नंदुरबार पोलीस कवायत मैदान येथे आगमन. मानवंदना व स्वागत. 11-00 वाजता नंदुरबार नगर परिषद नूतन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन (स्थळ- नूतन प्रशासकीय इमारत, स्टेशन रोड, नंदुरबार), सकाळी 11-20 मोटारीने श्री. छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराकडे प्रयाण. 11.-30 वाजता सत्कार, मानपत्र व मान्यवरांचे मनोगत समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. ( स्थळ- श्री.छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिर, नंदुरबार). दुपारी 12.15 वाजता माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या फार्म हाऊसकडे प्रयाण व राखीव. दुपारी 1.15 वाजता गजमल तुळशिराम पाटील मैदानाकडे मोटारीने प्रयाण. दुपारी 1.30 वाजता जाहीर सभेस उपस्थिती. (स्थळ – गजमल तुळशिराम पाटील महाविद्यालय मैदान, नंदुरबार). दुपारी 3-00 वाजता महाविद्यालय मैदान येथूनल मोटारीने पोलीस कवायत मैदानाकडे प्रयाण. दुपारी 3.15 वाजता पोलीस कवायत मैदान येथे आगमन व तेथून हेलिकॉप्टरने धुळेकडे प्रयाण.

हेही वाचा :

Back to top button