नाशिक : देवळालीत ढोल ताशाच्या गजरात हेल्यांची मिरवणूक | पुढारी

नाशिक : देवळालीत ढोल ताशाच्या गजरात हेल्यांची मिरवणूक

देवळाली कॅम्प; पुढारी वृत्तसेवा : काल (दि.२६) बलिप्रतिपदेनिमित्ताने देवळाली येथे गोठे धारकांकडून ढोल ताशाच्या गजरात हेल्यांच्या मिरवणूक काढण्यात आल्या. यावेळी कॅम्प परिसर लोकांच्या गर्दीने फुलून गेला होता. मिरवणुकीपुर्वी हिराबाई यादव, अनिता यादव, कविता यादव, सोनाली यादव, सोहम यादव आदींनी हेल्यांचे औक्षण केले.

देवळालीला दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला ‘हेल्यांची मिरवणूक’ काढण्याची प्रथा आहे. यामध्ये ज्या शेतकरी व गोठेधारककडे हेले आहेत ते सकाळी हेल्यांना उटण्याने आंघोळ घालून दिवसभरात त्यांच्या अंगावर विविध रंगानी रंगवत विविध चित्रे साकारतात. यावर्षी गोठे धारकांकडून हेल्ल्यांवर विवध देव देवतांचे व ५० खोके एकदम ओक्के असे चित्र रेखाटल्याने एक वेगळेच आकर्षण दिसुन आले. दरम्यान शहरातील गवळी वाडा येथील शिवमंदिर, दुर्गा मंदिर, शनी मंदिर, मारुती मंदिर अशा विविध मंदिरामध्ये सलामी देण्यात आली. यावेळी सुभाष यादव, अल्ली यादव कुमार यादव, राहुल यादव, साहेब राव पाळदे, प्रविण पाळदे, पप्पु गोडसे, प्रशांत पाळदे, पवन गायकवाड, मनोज ठाकरे, विजय निसाळ आदींसह नागरिक उपस्थित होते.

हे वाचलंत का?

 

Back to top button