धुळे: शिरपूर तालुक्यात ८ लाखांची गांजाची रोपे जप्त | पुढारी

धुळे: शिरपूर तालुक्यात ८ लाखांची गांजाची रोपे जप्त

धुळे; पुढारी वृत्तसेवा : कापसाच्या पिकाच्या आडोशाला गांजाची शेती करण्याचा प्रकार शिरपूर तालुका पोलिसांनी आज (दि.२४) उघडकीस आणला. शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये ८ लाखांची गांजाची रोपे जप्त करण्यात आली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर तालुक्यातील रोहिणी शिवारात वन विभागाच्या शेती पट्ट्यावर गांजाची शेती केली जात असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने दुपारी चार च्या सुमारास रोहिणी शिवारात शोध घेत गांजा शेतीवर छापा टाकला. शेतातून तब्बल ३९१ किलो गांजाची रोपे जप्त करण्यात आली. त्याची किंमत ७ लाख ८३ हजार ३२० रूपये इतकी आहे. याप्रकरणी असई कैलास जाधव यांच्या फिर्यादीवरून ठेमश्या पावरा याच्या विरोधत एनडीपीएस कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक भिकाजी पाटील करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button