नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये मुसळधार झाल्याने सोमेश्वर कॉलनी निगळमळा येथे महेंद्र इंटरनॅशनल कंपनीची भिंत कोसळून ५० घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानुसार एक महिन्यापासून सर्व पदाधिकारी यांनी पाठपुरावा करून नागरिकांना १० लाख रुपयांची नुकसानभरपाई धनादेश स्वरूपात दिली.
यावेळी महिंद्रा कंपनीचे अधिकाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या. पुन्हा अशा प्रकारे दुर्घटना घडणार नाही याची विशेष काळजी घ्यावी व संपूर्ण भिंत पारदर्शकपणे व उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करून बांधून द्यावी अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी आमदार सीमा हिरे, भाजपा शहर उपाध्यक्ष रामहारी संभेराव, माजी नगरसेवक विलास शिंदे, गोकुळ निगळ, महिंद्रा कंपनीचे प्रमूख पवन दोंदे, विनय मांढरे व सौरभ निगळ सुनील निगळ अक्षय निगळ, किरण निगळ, दिपक निगळ, तहसीलदार दोंदे, सातपूर मंडल अध्यक्ष भगवान काकड, चारुदत आहेर, राकेश ढोमसे यांच्यासमवेत महेंद्र इंटरनॅशनल अधिकारी आदी उपस्थित होते.