Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच | पुढारी

Nashik Lasalgaon : उन्हाळ कांदा दरात सुधारणा, मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

नाशिक, लासलगाव : वार्ताहर 
नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू असल्याने चाळीत साठविलेला उन्हाळ कांद्याला मोठा फटका बसला आहे तर नवीन लाल कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. कांदा दरात सुधारणा होऊन देखील शेतकरी वर्गाला झालेला खर्च देखील निघत नसल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे. सध्या लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ कांद्याला कमीत कमी ७०० सरासरी २०६० रुपये तर जास्तीत जास्त २६०० रुपये दर मिळत आहे.

राज्यात प्रमुख उन्हाळ कांदा उत्पादक असलेल्या नाशिक जिल्ह्यात सरासरी दराने २ हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडला मात्र चालू वर्षी शेतकरी उत्पादकता व दराच्याबाबतीत कोंडी झाल्याने हैराण झाला आहे. कांदा काढणीपासून ते सप्टेंबरअखेरपर्यंत दरात अपेक्षित सुधारणा झालीच नाही. साठवलेल्या कांद्याची ४० टक्क्यांवर सडला असून आवक घटल्याने दर सुधारत आहेत मात्र अखेरच्या टप्प्यात वाढलेले दर शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी काहीही लाभदायक नसल्याची स्थिती आहे. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने उन्हाळ कांदा अखेरचा टप्प्यात भाव खाऊ लागला आहे.

येथील बाजारातील भावाच्या चढ-उतारावर राज्यातील कांद्याचे भाव ठरतात. राज्यात परतीच्या पावसाने कांदा रोपांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्यामुळे यंदा कांदा दोन महिने उशिरा अगदी फेब्रुवारी महिन्यात विक्रीसाठी येणार आहे. सध्या बाजारात चाळीत साठवलेला कांदा विक्रीसाठी येत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात साठवलेला कांदा असून या कांद्याला सहा महिने झाले असून प्रतवारीत आणि वजनात मोठी घट झाली आहे. यामुळे कांद्याचे बाजार जरी वाढताना दिसत असले तरी मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा दिसत आहे.

हेही वाचा :

Back to top button