पिंपळनेर : बिबट्याच्या डरकाळीत वासराचा बळी; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण | पुढारी

पिंपळनेर : बिबट्याच्या डरकाळीत वासराचा बळी; ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील कासारे गावात बिबट्याने एका वासराचा फडशा पाडल्याची घटना सोमवारी, दि.17 सकाळी उघडकीस आली आहे. या संदर्भात वनविभागाला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळावर येवून पंचनामा केला. या घटनेमुळे कासारे व काटवान परिसरातील ग्रामस्थांसह  शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

येथील शेतकरी सतिष देसले त्यांच्या शेतात गेले असता त्यांच्या गोठ्यातील गाईचे वासरू मृतवस्थेत आढळून आले.  बिबट्याने रात्रीची सामसूम स्थिती आणि अंधाराची संधी उचलत वासराचा फडशा पाडला. वासरावर बिबटयाने ताव मारल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये होती. त्यामुळे तातडीने वनविभागाला पाचारण करण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती दिली असता पिंपळनेर येथील वनविभागातील वनरक्षक अधिकारी दिपाली बडगुजर, शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. दरम्यान, या घटनेमुळे कासारे व काटवान परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. साक्री तालुक्यातील काटवान परिसरातील गावांतील जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.  येथील बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडे केली आहे.

हेही वाचा:

Back to top button