दिपोत्सव : लालपरीचा प्रवास महागला २१ऑक्टोबर पासून हंगामी भाडेवाढ | पुढारी

दिपोत्सव : लालपरीचा प्रवास महागला २१ऑक्टोबर पासून हंगामी भाडेवाढ

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
लाल परीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने ३० टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे.

त्यानुसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही दि. २० ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री बारानंतर नंतर प्रवास सुरु करणा-या प्रवाशांना सुधारित १० टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. ही भाडेवाड ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यत राहील. सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.

ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे,त्या प्रवाशाकडून वाहकाव्दारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल. तथापी, ही भाडेवाढ एस.टी. च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विदयार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही. तर दि. १ नोव्हेंबर पासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमीप्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी. महामंडळाकडून कळविण्यात आले आहे”.

दिवाळीत जादा गाड्या सोडणार
दिवाळी आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता कुटुंबिय आणि मित्र परिवारासह पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने यंदा राज्यभरात दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते.त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमिपणे सोडण्यात येतील अशी माहिती साक्री आगारातून देण्यात आली आहे.

हेही वाचा:

Back to top button