नाशिक : तरुणाच्या मृत्यू प्रकरणी नऊ संशयितांना अटक | पुढारी

नाशिक : तरुणाच्या मृत्यू प्रकरणी नऊ संशयितांना अटक

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
येथील गंगावेस भागात शनिवारी (दि. 8) झालेल्या तुंबळ हाणामारीत वैदूवाडीतील शंकर मल्लू माळी (35) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी नऊ संशयित आरोपींना सिन्नर पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयाने 20 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सिन्नर येथील वैदूवाडी आणि मळहद्द भागातील युवकांमध्ये शनिवारी, दि. 8 दुपारी तुंबळ हाणामारी झाली होती. त्यात वैदूवाडी भागातील शंकर माळी याच्या पोटात धारदार शस्त्र लागल्याने त्याला उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने सिन्नरला मोठा तणाव निर्माण झाला होता. संशयितांना 24 तासांत अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मोर्चा काढण्याचा निर्णय रद्द करीत, मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले होते. संशयितांना अटक करण्यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख सचिन पाटील, अपर अधीक्षक माधुरी कांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे, सिन्नरचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी चार पथकांची निर्मिती करून संशयितांच्या तपासार्थ पाठविले होते. या प्रकरणी पोलिसांनी संशयित मोहन उर्फ पप्पू अशोक उगले, अनिल शिवाजी गाडे, गणेश तटाणे, ज्ञानेश्वर शिवाजी गाडे, सौरभ नाठे, दौलत तटाणे, अक्षय उगले, आकाश उगले, पप्पू लोखंडे या नऊ संशयितांना विविध ठिकाणांहून ताब्यात घेत अटक केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिली.

हेही वाचा:

Back to top button