नाशिक : घरफोडी करणारा अवघ्या 12 तासांत ताब्यात | पुढारी

नाशिक : घरफोडी करणारा अवघ्या 12 तासांत ताब्यात

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
हाजी अहमदपुरामध्ये सुमारे अडीच लाखांची चोरी करणार्‍याला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत जेरबंद केले. शेख इरफान शेख चाँद (35, रा. आयशानगर) असे संशयिताचे नाव आहे.

सादिया कलीम अहमद यांच्या गट नंबर 215 मधील घरात मंगळवारी (दि. 11) घरफोडी झाली होती. 90 हजारांचे सोने – चांदीचे दागिने व दीड लाख रुपयांची रोकड पळविली होती. याप्रकरणी रमजानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सहायक पोलिस निरीक्षक आशिष रोही तपास करीत होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना इरफान आंध्या याने चोरी केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस नाईक सुभाष चोपडा, नरेंद्रकुमार कोळी यांच्या युनिटने इरफानचा माग काढला. त्याला ताब्यात घेण्यात येऊन अंगझडती घेतली असता, 29 हजार 500 रुपयांची रोकड मिळून आली. या रकमेबाबत विचारणा केली असता, त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. उर्वरित रोकड आणि दागिन्यांबाबत मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेऊन रमजानपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा:

Back to top button