राजू शेट्टी संसदेत असते तर एफआरपी चे तुकडे करण्याची हिंमत झाली नसती - पुढारी

राजू शेट्टी संसदेत असते तर एफआरपी चे तुकडे करण्याची हिंमत झाली नसती

दिंडोरी ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकार व राज्य सरकार या दोघांनी मिळून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी चे तीन तुकडे करून मोठा धक्का दिला. आज राजू शेट्टी साहेब संसदेत असते. तर शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेण्याची हिंमत सरकारची झाली नसती.

राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रक्त सांडून एक रकमी एफ आर पी चा कायदा शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घेतला होता. जो पर्यंत शेट्टी साहेब संसदेत होते तो पर्यंत या कायद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत सरकारची झाली नव्हती. परंतु शेतकऱ्यांचा ढाण्या वाघ आज संसदेत नाही याचा फायदा घेऊन केंद्राने एफ आर पी चे तुकडे राज्य शासनाच्या शिफारशी नुसार केले.

इतर वेळेस छोट्या छोट्या गोष्टीवरून केंद्र व राज्य सरकार एकमेकांच्या विरोधात भांडत असतात. हा निर्णय घेताना मात्र राज्य सरकारने शिफारस केली व केंद्राने लगेच हिरवा कंदील दिला. या वरून दोन्ही सरकार शेतकरी विरोधी व कारखानदार धार्जिणे आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात आले आहे.

आता फक्त राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडेच लोक अपेक्षेने बघत आहे. म्हणून शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात एफ आर पी साठी संघर्ष अटळ आहे. असे प्रसिद्धी पत्रकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी म्हटले आहे.

Back to top button