ब्रेकिंग न्युज : भीषण अपघातातील संशयिताला अटक | पुढारी

ब्रेकिंग न्युज : भीषण अपघातातील संशयिताला अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील संशयिताला अटक करण्यात आली आहे. भीषण अपघातातील फरार ट्रकचालक संशयित रामजी यादव (रा. उत्तर प्रदेश) याला आडगाव पोलिसांनी केली अटक केली असून आयशर ट्रक (जीजे 05 बीक्स 0226 ) भरधाव जात असताना शनिवारी, दि.8 पहाटे बसची धडक लागून अपघात घडला होता. सूरतहून सिन्नरला कोळसा घेऊन जात असलेला ट्रकचा अपघात घडून आला. अपघातामध्ये बस जळून खाक झाल्याने 12 प्रवासी मृत्यूमुखी पडले. तर याप्रकरणी ट्रकचालकासह बसचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील आतापर्यंत आठ मृतदेहांची ओळख पटली असून उर्वरित चार मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्ट करणार असल्याचे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा:

Back to top button