नाशिक : भरधाव दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जखमी | पुढारी

नाशिक : भरधाव दुचाकीच्या अपघातात एक ठार तर एक जखमी

चांदवड : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील भयाळे गावाच्या शिवारातील वडाळीभोई – धोडांबे रस्त्याने भरधाव दुचाकीचालकाचा तोल जाऊन दोघांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याबाबत जयेश प्रल्हाद वाघ (१९, पळशी शिवार, द्साने शिवार, मालेगाव) याने दिलेल्या फिर्यादीनुसार वडनेरभैरव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे, मालेगाव तालुक्यातील पळशी शिवार (दसाणे) येथील प्रल्हाद नामदेव वाघ (४६) व सचिन बबन बच्छाव हे दोघे दुचाकीवरुन (क्र.एम. एच. ४१, ए. क्यू. २६७०) चांदवड तालुक्यातील वडाळीभोई धोडांबे रस्त्याने जात असताना भरधाव दुचाकीचालक प्रल्हाद यांचा तोल जाऊन दुचाकी रस्त्यावर आदळली. या अपघातात दोघे  गंभीर जखमी झाल्याने तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र, प्रल्हाद वाघ यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर सचिन बच्छाव यावर उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यावर वडनेरभैरवचे सहायक पोलीस निरीक्षक गौतम तायडे, पोलीस नाईक घुमरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

हेही वाचा:

Back to top button