Nashik : वृद्ध दाम्पत्याने पै-पै करून जमवलेल्या रकमेवर डल्ला | पुढारी

Nashik : वृद्ध दाम्पत्याने पै-पै करून जमवलेल्या रकमेवर डल्ला

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

जेवणासाठी मुलीकडे गेलेल्या वृद्ध दाम्पत्याचे घर बंद असल्याचा फायदा घेत कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातून सोने-चांदीचे दागिने व रोख रकमेसह ८२ हजार रुपयांचा माल चोरून घरफोडी केल्याची घटना म्हसरूळ येथे घडली आहे.

बोरगड, एकतानगर येथील आश्लेषा सोसायटीमध्ये माधव बाबूराव डबे हे वृद्ध दाम्पत्य राहत असून, परिसरात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात. शनिवारी (दि.१) दोघे पती-पत्नी त्याच सोसायटीत खालच्या मजल्यावर राहणाऱ्या मुलीकडे जेवण करण्यासाठी गेले होते. त्याच दिवशी दुपारी पाऊस सुरू झाल्याने ते मुलीकडे थांबलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद दरवाजाचा कडीकोयंडा उचकून घरात प्रवेश करत लोखंडी कपाटात ठेवलेले २१ ग्रॅम वजनाचे सोने-चांदीचे दागिने तसेच 30 हजार रुपये रोख असा एकूण ८२ हजार रुपयांचा माल चोरून घरफोडी केली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पै-पै करून जमवलेल्या रकमेवर डल्ला

फिर्यादी डबे या वयोवृद्ध दाम्पत्याने भाजीपाला विक्रीच्या व्यवसायातून कमावलेल्या रकमेपैकी उदरनिर्वाह करून पै-पै बचत केलेली रक्कम उपचारासाठी ठेवलेली होती. मात्र, तीही रोकड चोरट्याने चोरून नेल्याने डबे यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

हेही वाचा :

Back to top button