नाशिक : मनपात महिला कर्मचार्‍यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात | पुढारी

नाशिक : मनपात महिला कर्मचार्‍यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन येथे महिला कर्मचार्‍यांसाठी आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा उत्साहात झाल्या.

अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम, प्रभारी अतिरिक्त आयुक्त अर्चना तांबे आणि उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर यांच्या उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या. मनपाच्या समाजकल्याण विभागाने स्पर्धेचे आयोजन केले होते. मनपाचे सहा विभाग मिळून एकूण 105 महिला कर्मचार्‍यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. चमचा-लिंबू स्पर्धेत छाया चारोस्कर (घनकचरा व्यवस्थापन) यांचा प्रथम, जया बागडी (वैद्यकीय) यांचा द्वितीय आणि कला डगळे (छपाई) यांचा तृतीय क्रमांक आला. संगीत खुर्ची स्पर्धेत सविता येवले (ट्रेझरी) प्रथम, हेमांगी जाधव (महिला बालकल्याण) द्वितीय आणि जोत्स्ना राजपूत (पंचवटी ट्रेझरी) यांचा तृतीय क्रमांक आला. रांगोळी स्पर्धेत भावना चंदू कुंवर (विधी) प्रथम, सविता दशपुत्रे-येवले (ट्रेझरी) द्वितीय आणि मोनाली मोरे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. परीक्षक म्हणून डॉ. अजिता साळुंके, डॉ. कल्पना कुटे, प्रतिभा मोरे यांनी कामकाज पाहिले. महेश आटवणे, आनंद भालेराव, राजश्री जैन, आरती मारू, रमेश पागे यांनी सहकार्य केले.

पुरुष कर्मचार्‍यांच्याही स्पर्धा :
मनपातील पुरुष कर्मचार्‍यांच्याही स्पर्धा लवकरच होणार असल्याची माहिती मनपा उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी दिली. प्रथम विजेत्याला 1,501 रुपये आणि ट्रॉफी, द्वितीय क्रमांकासाठी 1,001, रुपये आणि ट्रॉफी, तिसर्‍या विजेत्याला 701 रुपये आणि ट्रॉफी अशी पारितोषिके दिली जाणार आहेत.

हेही वाचा:

Back to top button