नवरात्राेत्सव : जानोरीत जगदंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी | पुढारी

नवरात्राेत्सव : जानोरीत जगदंबामातेच्या दर्शनासाठी गर्दी

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील जानोरीसह पंचक्रोशीचे ग्रामदैवत असलेल्या जानोरीतील जगदंबामाता मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने गावात उत्साहाचे वातावरण आहे. येथील देवी मंदिराची स्थापना 1667 मध्ये झाल्याची माहिती मिळते. जुने मंदिर हे कौलारू छताचे व सागवानी लाकडामध्ये होते. परंतु कालांतराने मंदिर जीर्ण झाल्याने ग्रामस्थ व जगदंबा माता ट्रस्टच्या वतीने लोकवर्गणीतून 2012 मध्ये नव्याने मंदिराचे काम करण्यात आले. जगदंबामातेची मूर्ती 5500 किलो वजनाच्या एकाच दगडात साकारण्यात आली असून, या मूर्तीला अठरा हात असून, प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्र धारण आहेत. तसेच देवीने विविध प्रकारचे अलंकार परिधान केले असून, त्यामध्ये नाकात नथ, कानात कर्णफुले, गळ्यात मंगळसूत्र, पायात तोडे असे परिधान केलेले देवीचे सुंदर रूप दिसते. सध्या नवरात्रोत्सवामुळे गावात पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी हजरी लावत असल्याने आनंदाचे वातावरण आहे. येथील बोहाडा उत्सव भाविकांचे आकर्षण ठरत आहे. येथे दैनंदिन धार्मिक कार्यक्रमाला भाविकांची गर्दी होत आहे.

हेही वाचा:

Back to top button