नाशिक: नाशिकरोडच्या फर्निचर उद्योजकाचा मृतदेह मालेगावला सापडला

नाशिक: नाशिकरोडच्या फर्निचर उद्योजकाचा मृतदेह मालेगावला सापडला
Published on
Updated on

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील फर्निचर उद्योजकाचा मृतदेह मालेगाव येथे सापडला असून प्राथमिकदृष्ट्या आर्थिक व्यवहारातून त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

शिरीष गुलाबराव सोनवणे (56, रा. के जे मेहता हायस्कूल जवळ, नाशिकरोड) यांचा एकलहरे रोड नाशिक रोड येथे स्वस्तिक फर्निचर नावाचा कारखाना आहे. शुक्रवार (दि.9) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या वाहनातून सोनवणे हे कोणासही न सांगता कारखान्यातून निघून गेले. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या कारखान्यात कामाला असलेला नोकर फिरोज लतीफ शेख याने या संदर्भात नाशिकरोड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यास तपास यादी रवाना केल्या. सोनवणे यांच्या शोधासाठी तीन पोलीस पथक तैनात करण्यात आले होते. त्यापैकी एक समुह शिंदे गाव टोल प्लाजा येथे तर दुसरा समुह घोटी टोल प्लाजा येथे रवाना करण्यात आला. तसेच एक समुह स्थानिक पोलीस स्टेशनला तपास करीत होती. दरम्यान शिरीष सोनवणे यांचा मृतदेह मालेगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या सायतार पाडे शिवारात पाट कॅनलमध्ये शनिवारी (दि.10) रोजी पाटातील पाण्यात आढळून आला. या संदर्भात मालेगाव पोलिसांनी नाशिकरोड पोलिसांशी संपर्क साधून त्याबाबत माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे पुढील तपास करत आहेत. शिरीष सोनवणे यांचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत असून याबाबत पोलीस तपास करत आहेत.  त्याचप्रमाणे त्यांचे अपहरणाबाबतही शोध घेण्यात येत आहे.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news