Nashik : मालेगावी कृषीसेवा केंद्राला भीषण आग | पुढारी

Nashik : मालेगावी कृषीसेवा केंद्राला भीषण आग

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांमधील एका कृषीसेवा केंद्राला मंगळवारी दि.6 सकाळी अचानक आग लागली. तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

अवघ्या काही मिनिटांत आग शमविण्यात यश आले. परंतु, तत्पूर्वी भडकलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात औषधे, खते यांना झळ पोहोचली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दाभाडी येथील अनिल निकम यांचे हे शिवनेरी कृषी सेवा केंद्र असल्याचे सांगण्यात येते आहे.

हेही वाचा :

Back to top button