नाशिक : पंचवटीत मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे वृक्ष कोसळले | पुढारी

नाशिक : पंचवटीत मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे वृक्ष कोसळले

पंचवटी, नाशिक : पुढारी वृत्तसेवा
परिसरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व वार्‍यामुळे दोन ठिकाणी वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये कुठलीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. मात्र, काही काळ रस्ता बंद झाला होता. अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांमार्फत त्वरित दोन्ही ठिकाणांवरील वृक्ष हटविण्यात आले.

रात्री 10च्या सुमारास हिरावाडी रोडवरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयासमोरील व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर (व्हीटीसी) यांच्या मालकीच्या जागेतील संरक्षक भिंतीलगतच्या चिंचेचे झाड कोसळले. त्यामुळे हिरावाडीकडे जाणारा एका बाजूचा संपूर्ण रस्ता बंद झाला होता. तसेच मखमलाबाद रोडवरील मधुबन कॉलनीत रहिवासी इमारतीच्या आवारातील गुलमोहराच्या वृक्षाची फांदी रात्री अचानक कोसळली. यावेळी अग्निशामक विभागाचे एस. एच. माळी, एन. पी. म्हस्के, एम. एस. पिंपळे, व्ही. आर. गायकवाड, बाळू काकडे आदी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button