नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर येथे रहिवाशांचा ठिय्या आंदोलन; प्रशासनाकडून दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये संताप | पुढारी

नाशिक-पुणे महामार्गावर सिन्नर येथे रहिवाशांचा ठिय्या आंदोलन; प्रशासनाकडून दखल न घेतल्याने नागरिकांमध्ये संताप

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

सरस्वती नदीच्या पुरात संसार वाहून गेल्याने हतबल झालेल्या नागरिकांनी नाशिक- पुणे महामार्गावर आंदोलन केले असून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

नगरपालिका प्रशासन अथवा लोकप्रतिनिधी कोणीही भेट देऊन  स्थानिक रहिवाशांची साधी विचारपूसही केली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. महामार्गावर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहेत. लोकप्रतिनिधी अथवा नगरपालिका प्रशासन यांनी तत्काळ दखल घेऊन मदत करावी अशी मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे. माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्यासह काही कार्यकर्ते मनधरणी करत आहेत. मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आमच्यावर बेतलेला प्रसंग कठीण असून याची साधी दखल कोणी घेत नसेल तर ही परिस्थिती चांगली नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलीस उपाधीक्षक सोमनाथ तांबे आंदोलनस्थळी दाखल झाले असून ते आंदोलनकर्ते यांची समजूत काढत आहेत.

हेही वाचा:

Back to top button