Nashik Crime : तडीपार असतानाही चोरत होता दुचाक्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या | पुढारी

Nashik Crime : तडीपार असतानाही चोरत होता दुचाक्या; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

नाशिक : तडीपार असतानाही शहरात दुचाकी चोरणाऱ्या संशयितास ॲन्टी मोटारसायकल थेफ्ट व भद्रकाली गुन्हे शोध पथकाने संयुक्त कारवाई करीत पकडले. करण अण्णा कडूसकर (२१, रा. अंबड) असे या संशयित चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या चार व गुन्ह्यात वापरलेली एक अशा पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

शहरातील वेगवेगळ्या परिसरातून वाहन चोरी होत असल्याने या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दोन्ही परिमंडळमध्ये ॲन्टी मोटार थेफ्ट पथक नेमले आहेत. त्यानुसार या पथकातील पोलिस शिपाई संतोष पवार यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने दुचाकी चोरट्यास पकडण्यासाठी सापळा रचला होता. त्यांच्यासोबत भद्रकाली पथकाने संयुक्त कारवाई करीत करणला भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून पकडले. त्याला शहरातून तडीपार केले आहे, तरीदेखील तो शहरात विनापरवानगी वावरत होता. त्याचप्रमाणे तो वाहन चोरी करत होता. पोलिसांनी त्याच्याकडून पाच दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button