ईडीच्या यादीतील बारावा खेळाडू कोण? किरीट सोमय्यांनी सागून टाकले! | पुढारी

ईडीच्या यादीतील बारावा खेळाडू कोण? किरीट सोमय्यांनी सागून टाकले!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप नेते किरीट सोमय्या आज नाशिक दैाऱ्यावर होते. त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आरोप केले आहेत.

मंत्री भुजबळ मुंबईत ज्या इमारतीत राहतात ती इमारत कोणाच्या मालकीची आहे. या इमारतीवरुन किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी ईडीच्या लिस्टमधील तो १२ खेळाडू कोण याचही स्पष्टीकरण केले.

पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, मुंबईत सांताक्रुझ येथे भुजबळांची ९ मजली इमारत आहे. या इमारतीत संपूर्ण भुजबळ कुटुंब राहते. या बिल्डिंगची त्यांचा संबंध काय? ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या नावाने आहे. त्याच्याशी तुमचा संबंध काय? या इमारतीचे भाडे तुम्ही भरता की ही इमारतच तुम्ही विकत घेतली आहे?

एक खोली कोणी कोणाला राहायला देत नाही, तिथे भुजबळांना ९ मजली इमारत कशी दिली? ही इमारत बांधण्यासाठीचा पैसा कोठून आला? असे सवाल करतानाच परवेज कन्स्ट्रक्शन ही बोगस कंपनी असून या कंपन्या चालवणारे लोक बनावट आहेत, असा सोमय्या यांनी केला. येत्या शनिवारी या इमारतीची पाहणी करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.

आज किरीट सोमय्या यांनी नाशिकमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.

लिस्टमधला १२ वा खेळाडू जितेंद्र आव्हाड

किरीट सोमय्या यांनी नाशिकमध्ये अजून एक राजकीय गौप्यस्फोट केला. ईडीच्या लिस्टमधील १२ वा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते मंत्री जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी आज नाशिक मध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांनी ईडी च्या लिस्टमधील १२ वा खेळाडू कोण अशी विचारणा केली. यावर त्यांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच नाव घेतल.

हे ही वाचलत का :

Back to top button