जळगाव : अंबड येथील कारगील चौकात युवकाचा खून - पुढारी

जळगाव : अंबड येथील कारगील चौकात युवकाचा खून

सिडको; पुढारी वृत्तसेवा : सिडको येथील स्टेट बँक चौपाटीजवळ एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली. दरम्यान, ही घटना ताजी असतानाच अंबड कारगील चौक परिसरात मंगळवारी (दि.३१) रात्रीच्या सुमारास जुन्या भांडणाची कुरापत काढून एका तरुणास धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे.

याबाबत अंबड पोलिस ठाण्यात संशयितांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितांचे धागेदोरे हाती लागले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सिडकोतील स्टेट बँक चौपाटीजवळ असलेल्या सोनाली मटन खानावळसमोर मागच्या काही दिवसांपुर्वी खून झाल्याची घटना ताजी असताना काल (दि.३१) पुन्हा असाच प्रकार घडला आहे.

अंबड पोलिस स्टेशनच्या हद्दीत महिनाभरात दोन खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.३१) राजी रात्री साडे नऊच्या सुमारास राहुल गवळी (२५) याचा कारगील चौकात या युवकाचा खून करण्यात आला.

या युवकास अंबड येथील कारगील चौक परिसरात जुन्या भांडणाची कुरापत काढून तीन ते चार संशयितांनी राहुल यास बेदम मारहाण केली. तसेच त्याच्यावर प्राणघातक हल्ला करीत धारदार शस्त्राने वार केला.

यात राहुल हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस आयुक शोएब शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, श्रीकांत निंबाळकर यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले.

खून करणाऱ्या संशयितांची माहिती मिळाली असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले. अंबड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल हा कामगार असून सेंट्रीगचे काम करत होता.

Back to top button