नाशिक : हवामान विभागाकडून इशार्‍यानंतरही स्थानिक प्रशासन बेसावधपणा - पुढारी

नाशिक : हवामान विभागाकडून इशार्‍यानंतरही स्थानिक प्रशासन बेसावधपणा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

गेल्या दोन दिवसांपूर्वीच २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता तसेच नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नगरसह नाशिक जिल्ह्याला सतर्कतेचा इशारा हवामान विभागाचे प्रमुख होसाळीकर यांचेमार्फत देण्यात आल्यानुसार जिल्हा प्रशासनाने देखिल सावधतेचा इशारा दिला होता. परंतु स्थानिक प्रशासनाने गांभीर्याने न घेत गाफिल राहीले. व चाळीसगाव तालुक्यात परिसरातील नदीकाठच्या गावातील नागरिकांना देखिल सतर्कतेचा इशारा न दिल्याने या नैसर्गीक आपत्तीत पशुधनाची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे.

चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी

जिल्ह्यात सर्वात जास्त १३३.२ मि.मी. पाऊस चाळीसगाव तालुक्यात झाला असून जळगाव तालुक्यात ७.७, भुसावळ ११.७, यावल ११.२, रावेर ११.७, मुक्ताईनगर ६.१, अमळनेर १३.१, चोपडा ८.६, एरंडोल १३.८, पारोळा १४.३, जामनेर ३१.४, पाचोरा २०.४, भडगांव १९.१, धरणगांव ११.६, बोदवड १७.९ असे एकूण २३.४ मि.मी पाउस झाला आहे. तर ऑगस्ट अखेर १५२.५मि.मी. नुसार ७७.८ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली आहे.

तितूर डोंगरी नद्यांच्या उगम क्षेत्रात दमदार पावसामुळे पूर आला असून मन्याड नदीला देखिल पूर आल्यामुळे प्रकल्पातून सुमारे १५०० क्यूसेक पाणी गिरणा नदीपात्र व जामदा बंधार्‍यात सोडले जात आहे. त्यामुळे गिरणा, तितूर व नदीपात्र गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मध्यम प्रकल्प पातळीत वाढ

जिल्ह्यातील तीन मोठया प्रकल्पांपैकी हतनूर प्रकल्पात ४०.७८ टक्के पाणीसाठा असून गेल्या चोवीस तासात १८. मि.मी पावसाची नोद झाली आहे. तर १९.५० दलघमी पाण्याची आवक झाली आहे. गिरणा ४५.०३, वाघूर ६१.५७ तर मध्यम प्रकल्पापैकी अभोरा, मंगरूळ, मन्याड, बोरी हे प्रकल्प पूर्ण भरले असून हिवरा प्रकल्पात ६६.३९ टक्के पाणीसाठा आहे. अग्नावती ३१.३७, अन्य प्रकल्पात तुरळक प्रमाणात पाण्याची आवक होत असून जिल्ह्यातील ९६ लघू, मध्यम व मोठया प्रकल्पांत सरासरी ४७ टक्के पाणीसाठा आहे.

Back to top button