जळगाव पूर : डोंगरी नदीच्या पुराच्‍या पाण्‍यात बुडाल्‍याने वृद्धेचा मृत्‍यू | पुढारी

जळगाव पूर : डोंगरी नदीच्या पुराच्‍या पाण्‍यात बुडाल्‍याने वृद्धेचा मृत्‍यू

जळगाव पुढारी वृत्तसेवा :  (जळगाव पाऊस) सोमवारी रात्री आलेल्या पावसामुळे चाळीसगावसह तालुक्यात तितुर व डोगरी नद्यांना पूर आल्याने वाकडी येथील वृद्धेचा पुरात वाहून गेल्याने बुडून मृत्यू झाला. कलाबाई पवार (६३) असे त्‍यांचे नाव आहे.  दरम्‍यान, अनेक गुरे-ढोरे, वाहने पाण्यात वाहून गेली आहेत. तर नदीकाठच्या घरामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोमवारी रात्री चाळीसगावसह तालुका परिसरात झालेल्या पावसामुळे तितूर व मण्यार नद्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्यात वाकडी ता. चाळीसगाव येथील कलाबाई पांचाळ वाहून गेल्‍या. धुळे येथील राज्य आपत्ती निवारण दलाने चाळीसगाव कन्नड दरम्यान दरड कोसळल्याने बंद झालेला औरंगाबाद चाळीसगाव धुळे रस्ता वाहतुकीस खुला केला आहे.

खबरदारी व परिस्थिती वर लक्ष देण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दल (धुळे) पथक दोन दिवस त्या ठिकाणी मुक्कामी राहणार आहे, अशी माहिती जळगांव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ यांनी दिली आहे.

मुसळधार पावसामुळे चाळीसगाव ते औरंगाबाद दरम्यान असलेल्या कन्नड घाटात सोमवारी रात्री दरड कोसळल्याने वाहतुक विस्कळीत झाली होती. जिल्ह्यात सोमवार रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील नद्यांना पूर आला आहे.

या पुरात दोन इसम अडकले असल्याचा अंदाज असून तीन ते चार गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. या पुरामुळे चाळीसगाव शहरातील नदीकाठच्या परिसरातील नागरी वसाहतीत पाणी शिरले आहे. त्यामुळे तेथे संपर्क होउ शकत नसल्याचे चाळीसगाव तहसिलदार अमोल मोरे यांनी जिल्हाधिकार्‍यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

चाळीसगाव शहर

तितुर व डोंगरी नदी चा संगम शहरात होत असल्यामुळे सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे या दोन्ही नद्यांना पूर येऊन मुसा कादरी दर्गा परिसर नदीकाठच्या परिसरासह शहरात पाणी घुसले आहे. शहराचा संपर्क तुटला आहे. नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, गुरे व वाहने वाहून गेली आहे तर वीज पुरवठा अद्यापही बंद आहे.

वाकडी

डोंगरी नदीच्या पुरामुळे गावातील गुरे वाहून गेली आहेत. पिकांचे नुकसान झाले आहे. गावातील रस्ते वाहून गेले आहे. नदीकाठी रहात असलेल्या कलाबाई पवार या पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली.

वाघूड

डोंगरी नदीच्या पुरामुळे गोरे वाहून गेली आहे. वीज पुरवठा बंद आहे. तर गावातील वीज तारा तुटलेल्या अवस्थेत आहेत. शेतात पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान झाले.

हिंगोणे

तितुर नदीला आलेल्या पुरात दोन पान टपरी वाहून गेली आहे. तर गावातील शाळेची भिंत तुटली आहे. गुरे वाहन गेली आहेत.

खेर्डे

डोंगरी नदीच्या पुरामुळे घरात पाणी शिरले. तर शाळा ग्रामपंचायत मध्ये सुद्धा पाणी शिरले आहे. वाहून गेल्यामुळे मयत झाली. गावाचा संपर्क तुटला.

मुदखेडे

वाडी व तुतुर नदीच्या पुरामुळे काठावरील घरांमध्ये पाणी शिरले. काठावरील नागरिकांना मंगल कार्यालयात हलविण्यात आले आहे.

बोरखेडे खुर्द

वाडी वरची पूर्ण विचार पुरामुळे काठावरील घरांमध्ये पाणी शिरले आहे. तर यापुढे अनेक मुले वाहून गेल्याने मृत्यू झाला. तर गावातील वीज पुरवठा बंद आहे.

हेही वाचलं का?

ओंकारेश्वर : एक अद्भुत ज्योतिर्लिंग

 

Back to top button