नाशिक : लाचखोर पोलिस शिपाई गजाआड | पुढारी

नाशिक : लाचखोर पोलिस शिपाई गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गुन्ह्यात अटक न करण्याच्या मोबदल्यात संशयित आरोपीकडून 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या पोलिस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. सचिन राजेंद्र पवार (29) असे या पोलिस शिपायाचे नाव असून, तो जायखेडा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील जायखेडा पोलिस ठाण्यात एका 25 वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात युवकाला अटक न करण्यासाठी पोलिस शिपाई सचिन पवारने युवकाकडे 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. 30 हजार रुपये घेण्यास संशयित पवार तयार झाल्यावर युवकाने याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहळदे, उपअधीक्षक सतीश भामरे यांनी पथक तयार केले. त्यानुसार पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार पंकज पळशीकर, पोलिस नाईक नितीन कराड, प्रभाकर गवळी, वैभव देशमुख, संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने जायखेडा पोलिस ठाण्यालगत सापळा रचला. लाच घेण्याच्या तयारीत असताना पवारला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने तक्रार करणार्‍या व गुन्ह्यातील संशयित आरोपींकडून पोलिसांकडून होणारी लाचेच्या मागणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा :

Back to top button