नाशिक : गिरणा नदीत पाणीपुरी विक्रेत्याची आत्महत्या | पुढारी

नाशिक : गिरणा नदीत पाणीपुरी विक्रेत्याची आत्महत्या

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा
लोहोणेर – ठेंगोडा गावादरम्यान वाहणार्‍या गिरणा नदीपात्रात रविवारी पहाटे परप्रांतीय तरुणाने आत्महत्या केली. सटाणा येथे वास्तव्यास असलेला मूळचा झाडी (उत्तर प्रदेश) येथील पाणीपुरी व्यावसायिक मोहित रामलखन प्रजापती (26) असे मृताचे नाव आहे. त्याने पुलावर स्कुटी उभी करून नदीत उडी घेत आत्महत्या केली.

सटाणा पोलिस ठाण्यात सदर व्यक्ती हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक तरुणांच्या मदतीने गिरणा नदीपात्रात शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान नाशिक येथून ‘एनडीआरएफ’च्या पथकालाही पाचारण करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. देवळा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप लांडगे यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. गिरणा नदीवरील पूर्व बाजूला असलेल्या नवीन पुलाच्या पूर्व बाजूकडील ठिकाण हे सुसाइड पॉइंट ठरले आहे. तेथूनच अनेकांनी आत्महत्या केली आहे. त्या ठिकाणी सुरक्षित जाळ्या बसविण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button