
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरणार्या सराईत गुन्हेगाराला नाशिकरोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून सहा दुचाकींसह एक लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. पोलिस उपआयुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पवन रमेश पाटील (26 रा. शिवपरी चौक, बुरकुले हॉलजवळ, उत्तमनगर, सिडको) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
त्याची कसून चौकशी केली असता त्याने नाशिक शहरातील विविध भागांतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. मोहिमेत आजपर्यंत नाशिकरोड पोलिसांनी नऊ लाख 50 हजार किमतीच्या 33 दुचाकी जप्त केल्या आहेत. नाशिकरोड, आडगाव, पंचवटीसह इतर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेलेल्या दुचाकींचा यात समावेश आहे. सिद्धेश्वर धुमाळ, गणेश न्यायदे, राजू पाचोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.