नाशिक : पंचवटीतील ‘ब्लॅक स्पॉट’ झाले चकाचक

नाशिक : पंचवटीतील ‘ब्लॅक स्पॉट’ झाले चकाचक
Published on
Updated on

नाशिक (पंचवटी)  : पुढारी वृत्तसेवा
पंचवटीतील मुख्य चौकांमधील कचरा, गाळ आणि चिखलांमुळे तयार झालेल्या 'ब्लॅक स्पॉट'बाबत दै. 'पुढारी'मध्ये सचित्र वृत्त प्रसिद्ध होताच खडबडून जागे झालेल्या मनपाच्या पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागाने परिसरात धडक स्वच्छता मोहीम राबवून ते 'ब्लॅक स्पॉट' चकाचक केले.

पंचवटीतील निमाणी बसस्थानक कॉर्नर, दिंडोरी रोड कॉर्नर, पेठ रोडवरील फुलेनगर परिसर आदी ठिकाणी नेहमीच कचर्‍याचे साम—ाज्य निर्माण झाल्याचे आढळते. सध्या पावसाळा सुरू असल्याने या ठिकाणी कचरा कुजून दुर्गंधी पसरलेली असते. या संदर्भात दै. 'पुढारी'ने शनिवारी (दि. 13) छायाचित्रांसह 'स्वच्छ, सुंदर, हरित नाशिक ओळखा आता खरोखरी?' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. वृत्त प्रसिद्ध होताच मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने या परिसरातील कचरा हटवून परिसर स्वच्छ केल्याचे आढळून आले. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, स्वच्छता मोहीम नियमित सुरू असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

अपु-या घंटागाड्या 

पंचवटी विभागात कचरा उचलण्यासाठी कमीत कमी 100 घंटागाड्यांची गरज असून, सध्या अवघ्या 50 घंटागाड्या उपलब्ध आहेत. यामुळे प्रत्येक परिसरात नियमितपणे घंटागाडी पाहोचू शकत नाही. कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी रोजच्या रोज सगळ्या प्रभागांत फिरू शकत नाही. दोन-तीन दिवसांआड एका एका प्रभागात घंटागाडी जात असते. यामुळे नागरिकांकडे दररोज कचरा साचतो. हा साचलेला कचरा दिसेल तिथे रस्त्यावर, रस्ता दुभाजकांमध्ये, रस्त्याच्या कडेला ते टाकून देतात. त्यामुळे ब्लॅक स्पॉटची निर्मिती होते.

नागरिकही जबाबदार 

ब्लॅक स्पॉट तयार होण्याला नागरिकही तेवढेच जबाबदार असल्याचे दिसून येते. घंटागाडीमध्ये कचरा टाकायला नागरिक कंटाळा करतात व जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुठे बाहेर जाताना कचरा बरोबर घेऊन रस्त्यात टाकून देतात. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून ब्लॅक स्पॉट परिसरात नियमित जनजागृती केली जाते. लोकांना घंटागाडीतच कचरा टाकावा, असे आवाहन केले जाते. मात्र, नागरिकांकडून याकडे दुर्लक्ष केले जाते. नागरिकांनीही आपला परिसर, आपलं शहर स्वच्छ रहावे. 'स्वच्छ, सुंदर, हरित, नाशिक, ओळख आता खरोखरी', गाण्यातील या ओळी खर्‍या होण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news