नाशिक : अशोकनगर’ला सिटीलिंक बसेसची समोरासमोर धडक, 15 प्रवाशी जखमी

नाशिक : अशोकनगर’ला सिटीलिंक बसेसची समोरासमोर धडक, 15 प्रवाशी जखमी
Published on
Updated on

नाशिक सातपूर : पुढारी वृत्तसेवा

सातपूर परिसरातील अशोक नगर येथील बागुल ड्रायव्हिंग स्कूल जवळ गुरवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास दोन सिटीलिंक बसेस समोरासमोर धडकल्या. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंचवटी डेपोची बस क्र Mh 15 gv7963 ही बस बारदान फाट्यावरून अशोक नगर मार्गे निमानी कडे जात असताना त्याच मार्गावरून Mh15gv 7891 निमानी ते बारदान फाटा ही बस जात होती यावेळी दोन्ही बसेसची समोरासमोर धडक झाल्याने अपघात झाला. या अपघातात दोन्ही बसेसचे मोठे नुकसान झाले आहे.  बसमधील सुमारे 15 प्रवाशी जखमी झाले असून प्राथमिक उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या अपघातानंतर नाशिक मनपाच्या सिटी लिंक चे चालक किती निष्काळजीपणे बस चालवतात याचा प्रत्यय सातपूरकरांना आला.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news