जळगाव: पुढारी वृत्तसेवा
शहरातील एका तरुणाचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि.८ दुपारी १ वाजता घडली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना सुरेश सोनवणे (३२, रा. इच्छादेवीचौक) हा लक्झरी बस स्टॉप वर वाहकाचे काम करत होता. तो तलावात बुडत असल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी प्रसंगावधान होत घटनास्थळी धाव घेतली. तसेच एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळ गाठून तरुणास बाहेर काढले. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी सोनवणे यास मयत घोषित केले. नाना सोनवणे यांच्या पश्चात आई, भाऊ, दोन विवाहित बहिणी, पत्नी असा परिवार आहे. तर वडिलांचे पाच वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले.