नाशिक: सामोडे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचा झेंडा | पुढारी

नाशिक: सामोडे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास पॅनलचा झेंडा

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा: साक्री तालुक्यातील सामोडे ग्रामपंचायत निवडणुकीत माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, शंकर शिंदे, कैलास महंत यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते हर्षवर्धन दहिते यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनलने सर्व जागा जिंकत  वर्चस्व राखले. या निवडणुकीत विरोधी पॅनलला एकही जागा मिळवता आली नाही.

सामोडे ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यातील ७ जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे उर्वरित १० जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यात युवा नेते हर्षवर्धन दहिते यांच्या ग्रामविकास पॅनलने विरोधकांचा सुपडा साफ करत दणदणीत विजय मिळविला. तर परिवर्तन पॅनलचे वसंत शामराव घरटे हे स्वतः पराभूत झाले असून परिवर्तन पॅनलला एकही जागा मिळू शकली नाही.

निवडणुकीत पंकज दहिते यांना ९२६ मते व विरोधी उमेदवार वसंत घरटे यांना केवळ १२२ मते मिळू शकली. तर सचिन शिंदे यांना ६९५ मते व वसंत घरटे यांना ५२० मते मिळाली. एका जागेवर अपक्ष उमेदवार सागर अशोक पानपाटील विजयी झाले आहेत. दरम्यान, विजयानंतर ग्रामविकास पॅनलने एकच जल्लोष केला.

विजयी उमेदवार –

विजयी उमेदवारांमध्ये वार्ड क्र .१ मधून तुकाराम तुळशीराम दहिते व भारती राजू मालूसरे, वार्ड क्र.२ मधून सुरेखा राजेंद्र घरटे व सोमनाथ पंडीत गांगुर्डे, वार्ड क्र.३ मधून सचिन पंडितराव शिंदे व शशिकला शरद भदाणे, वार्ड क्र.५ मधून मनिषा रवींद्र शिंदे, अर्जुन शंकर सोनवणे, सोनम सुनिल पवार

बिनविरोध झालेले ७ उमेदवार –

सुशिला सखाराम बागुल, कविता नंदु कुवर, रावसाहेब सीताराम घरटे, आरती दीपक भारुडे, गुलाब उत्तम मालुसरे, अर्चना नंदलाल घरटे, अशोक वसंत मोरे यांचा समावेश आहे.

Back to top button