नाशिक : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावे बनावट व्हॉटस्ॲप अकाऊंट | पुढारी

नाशिक : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचे नावे बनावट व्हॉटस्ॲप अकाऊंट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकचे मनपा आयुक्त डाँ. चंद्रकांत पुलकंडुवार यांच्यानंतर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचा डीपी असलेल्या एका मोबाईल क्रमांकावरुन व्हॅटसअप अकाऊंट तयार करण्यात आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. या मोबाईल क्रमांकावरुन अधिकाऱ्यांना किंवा कुणाला संदेश आला तर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे किंवा सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे आवाहन राधाकृष्ण गमे यांनी केले आहे.

“कुणीतरी माझ्या नावाने 9340233468 हा मोबाईल क्रमांक वापरत आहे. त्यावर माझा डीपी दिसत आहे. काही संदेश आला तर त्याला प्रतिसाद देवू नये.” -राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त, नाशिक

Back to top button