नाशिक : निमदरा घाटात बिबट्याचे दर्शन, परिसरात पसरली दहशत | पुढारी

नाशिक : निमदरा घाटात बिबट्याचे दर्शन, परिसरात पसरली दहशत

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील देशवंडी-सुळेवाडी दरम्यानच्या निमदरा घाटात रात्रीच्या वेळी प्रवास करणार्‍या नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले. मात्र चारचाकी वाहनात प्रवासी असल्यामुळे सुरक्षितरित्या रस्ता कापता आला. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.

घाट परिसर असल्याने या भागात जंगली श्वापदांचा नेहमीच वावर असतो. बारागाव पिंप्री येथील दशरथ रोडे हे कुटूंबीयांसह नाशिकहून घराकडे परतत होते. देशवंडी-सुळेवाडी दरम्यानच्या निमदरा घाटात बिबट्या त्यांना रस्त्यावर उभा दिसला. चारचाकीच्या प्रकाशात दमदार पावले टाकत बिबट्या रस्त्यालगतच्या झाडीत घुसला. वाहनाच्या लाईटचा प्रकाश डोळ्यांवर पडल्यानंतरही बिबट्या हलत नव्हता, असे रोडे यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. साधारणपणे दहा मिनिटांनंतर बिबट्या झाडींमध्ये शिरला. रोडे यांनीही सुरक्षितपणे वाहन काढून घराकडे मार्गक्रमण केले.

आम्ही चारचाकी वाहनात असल्यामुळे सुरक्षित राहीलो. अन्यथा बिबट्याच्या हल्ल्याची भीती होती. बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिक घाबरले आहेत. वनविभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
– दशरथ रोडे, प्रत्यक्षदर्शी

हेही वाचा :

Back to top button