नाशिक : मविप्रसाठी 28 ऑगस्टला मतदान, 'या' तारखेला लागणार निकाल | पुढारी

नाशिक : मविप्रसाठी 28 ऑगस्टला मतदान, 'या' तारखेला लागणार निकाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बहुप्रतीक्षित मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, 28 ऑगस्टला मतदान होणार आहे. तर 29 ऑगस्टला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होऊन निकाल जाहीर होतील. 5 ते 12 ऑगस्ट या कालावधीत अर्ज दाखल करता येतील तर 13 रोजी छाननी होईल.

यासाठी निवडणूक मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून, चेअरमन म्हणून अ‍ॅड. भास्करराव चौरे, तर सदस्य म्हणून अ‍ॅड. काशीनाथ रामदास खांदवे, अ‍ॅड. महेश पाटील यांची, तर सचिव म्हणून संस्थेतील प्रा. डॉ. डी. डी. काजळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मविप्र संस्थेच्या कार्यकारिणीची बैठक सभापती माणिकराव बोरस्ते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निवडणूक मंडळाकडे तालुकानिहाय अंतिम मतदारयाद्या, संस्थेची घटना, नियमावली संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या वतीने सरचिटणीस व सभापती यांनी सुपूर्द केल्या आहेत.

Back to top button