नाशिक : टोमॅटोला अवघा अडीच रुपये किलो भाव! | पुढारी

नाशिक : टोमॅटोला अवघा अडीच रुपये किलो भाव!

पंचवटी (नाशिक), पुढारी वृत्तसेवा : काकडी, शिमला पाठोपाठ आता टोमॅटोलाही भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः टोमॅटोने भरलेल्या जाळ्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात फेकून देत संताप व्यक्त केला.

पेठरोडवरील शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड आवारात नाशिकसह निफाड,सिन्नर आदी भागांतून टोमॅटो आवक होते. बुधवारी (दि.२५) जवळपास ४७, ३०० जाळ्यांची आवक झाली.

प्रतवारीनुसार एका जाळीला अवघे ५० ते १८० रुपये बाजारभाव मिळाला. रात्री उशिरा टोमॅटोची आवक आणखी वाढल्याने सुमारे दहा ते बारा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचा माल मार्केट यार्ड आवारात व प्रवेशद्वारावर टाकून संताप व्यक्त केला.

दरम्यान, या संदर्भात बाजार समिती प्रशासनास विचारणा केली असता संबंधित टोमॅटो हा बदला मालं म्हणजेच किडीचा माल असल्याने व्यापारी वर्गाने घेतला नाही, असे सांगितले.

Back to top button