BJP Vs Shivasena : "सामनाच्या संपादकावर गुन्हा दाखल करा" | पुढारी

BJP Vs Shivasena : "सामनाच्या संपादकावर गुन्हा दाखल करा"

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : सामनाच्या अग्रलेखातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल वादग्रस्त लिखाण लिहिले असून सामनाच्या संपादकावर कारवाई करा, अशी मागणी नाशिक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी (BJP Vs Shivasena) केली आहे. भाजप आमदार देवयानी फरांदे, शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह नगरसेवक आणि इतर पदाधिकारी पोलिस आयुक्तालयात ही मागणी केली.

बुधवारी सकाळी शहरात सामनाच्या अग्रलेखाचे होर्डिंग्ज लागले. आ. देवयानी फरांदे यांनी केलेल्या आरोपानुसार पोलिस आयुक्तांना याबाबत कल्पना देऊनही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. कायदा सर्वांना समान आहे तर सामनाच्या संपादकावर गुन्हा दाखल करून कारवाई करा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

त्याचप्रमाणे नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर शहरात शिवसेना-भाजपा कार्यकर्ते (BJP Vs Shivasena) समोरासमोर भिडले. याचदरम्यान दगडफेकीत भाजप कार्यालयाचे नुकसान झाले. दगडफेक करणाऱ्यांना अभय दिले जात असून त्यांना अटक केलेली नाही. त्यांचे मुख्यमंत्री अभिनंदन करत आहेत. त्यामुळे पोलिसांना हाताशी धरून राजकारण होत असल्याचाही आरोप पदाधिकाऱ्यांनी यावेळी केला आहे.

पहा व्हिडीओ : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय ?

हे ही वाचा

Back to top button